E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
Wrutuja pandharpure
08 Apr 2025
केपटाउन
: अलीकडेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला केंद्रीय करार जाहीर केला होता. ऑस्ट्रेलियाने केंद्रीय करार यादीत २३ खेळाडूंना स्थान दिले होते. ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका संघाने केंद्रीय करार जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेने २०२५-२६ साठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकाने २०२५-२६ हंगामासाठी दोन प्रकारचे करार जाहीर केले आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय करार आणि हायब्रिड करार यांचा समावेश आहे.राष्ट्रीय करारात १८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, तर हायब्रिड करारात २ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. हायब्रिड करारांतर्गत, डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांना विशिष्ट द्विपक्षीय दौरे आणि आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी करारबद्ध केले जाईल.
’या’ खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाला करार
वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्स आणि अष्टपैलू सेनुरन मुथुसामी यांना पहिल्यांदाच करार देण्यात आला आहे. राष्ट्रीय करार मिळालेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज क्वेना म्फाका यांचा समावेश आहे, ज्याने गेल्या हंगामात सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आगामी हंगामासाठी अष्टपैलू खेळाडू विआन मुल्डर, डेव्हिड बेडिंगहॅम आणि काइल व्हेरेन यांना कायम ठेवण्यात आले आहे.
हेनरिक क्लासेन करारातून बाहेर
क्रिकेट साउथ आफ्रिकेच्या मते, हेनरिक क्लासेनच्या भविष्याबाबत चर्चा सुरू आहे आणि योग्य वेळी अंतिम निर्णय घेतला जाईल. आता तरी त्याला करारातून बाहेर ठेवले आहे.राष्ट्रीय संघ आणि उच्च कामगिरी संचालक एनोच एनक्वे म्हणाले की, पुढील १२ महिन्यांसाठी राष्ट्रीय करार मिळालेल्या सर्व खेळाडूंचे, विशेषतः ज्यांना पहिल्यांदाच करार मिळत आहेत, त्यांचे मी अभिनंदन करू इच्छितो. पुढील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आणि मायदेशी होणार्या २०२७ क्रिकेट वर्ल्ड कपचे महत्त्व लक्षात घेऊन या सर्व खेळाडूंना करार देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय करार मिळालेले खेळाडू : टेम्बा बावुमा, डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जॉर्जिओ, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, क्वेना मफाका, एडन मार्कराम, वायान मुल्डर, सेनुरान मुथुसामी, लुंगी र्यानबा, लुंगी, र्या, ट्रिबा, काउ, रीझा एंड्रिक्स स्टब्स, काइल वेरेन आणि लिझाड विल्यम्स.
Related
Articles
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीच्या प्रणालीत बदल करणार?
13 Apr 2025
युक्रेनला ब्रिटनचा पाठिंबा शस्त्रे, दारुगोळा देणार
12 Apr 2025
सोनिया, राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र
16 Apr 2025
लग्नाच्या आमिषाने महिला डॉक्टरवर बलात्कार
14 Apr 2025
काळभैरवनाथ यात्रा महोत्सव उत्साहात
16 Apr 2025
विधेयकाच्या मंजुरीबाबत राष्ट्रपतींना कालमर्यादा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार